








बेळगाव : एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शोभा कुलकर्णी यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय व मौलिक योगदानाबद्दल ‘भारत नारी शक्ती गौरव सन्मान-२०२६’ प्रदान करण्यात आला. नीती आयोगाच्या पुरस्कार कार्यक्रमांतर्गत नवी दिल्ली येथील वर्दी वेलनेस फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने त्यांना हा सन्मान देण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच शिक्षणाच्या माध्यमातून समाजघडणीत दिलेल्या योगदानाची दखल घेत प्राचार्या शोभा कुलकर्णी यांना गौरविण्यात आले.
यासोबतच त्यांना ‘भारत नारी शक्ती अवॉर्ड-२०२६’ तसेच ‘बेला टीचर्स अवॉर्ड-२०२६’ यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगावमधील विविध सामाजिक व शैक्षणिक संघटना, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच पालकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta