Sunday , October 4 2026
Breaking News

नारायण सुर्वे यांच्या व्यक्तित्वावर डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे व्याख्यान

Spread the love

 

बेळगाव : ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंथन कल्चरल अ‍ॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथील साहित्यिक व व्याख्यात्या डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे ‘ऐसा गा मी ब्रह्म’ अर्थात ‘नारायण सुर्वे : व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

हे व्याख्यान 30 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता टिळकवाडी येथील वरेरकर नाट्यसंघात आयोजित करण्यात आले आहे. नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक प्रवासासह त्यांच्या सामाजिक जाणिवा, संघर्षमय जीवन आणि कर्तृत्वाचा वेध या व्याख्यानातून घेतला जाणार आहे.

साहित्यप्रेमी, रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंथन कल्चरल अ‍ॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *