Sunday , October 4 2026
Breaking News

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा

Spread the love

 

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी एकत्रितपणे आंदोलनाची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत जनमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे या मोर्चाचे आवाहन केले असून, हा मोर्चा केवळ दोन पक्षांपुरता मर्यादित न ठेवता इतर राजकीय पक्षांनाही सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले आहे. मोर्चाची निश्चित वेळ आणि मार्गाबाबतची माहिती नंतर जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, SIR प्रक्रियेतील निर्णयांवरून निवडणूक आयोगातील कथित मतभेदांबाबतच्या वृत्तानंतर हा वाद अधिक तीव्र झाला आहे. काही वृत्तांनुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी विविध निर्णयांबाबत आक्षेप नोंदवल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने SIRसह सर्व निर्णय सर्वानुमते झाल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातही याचिका

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात २५ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत SIRशी संबंधित काही निर्णय इतर निवडणूक आयुक्तांच्या संमतीशिवाय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, अशा निर्णयांना बेकायदेशीर ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच SIRदरम्यान सुमारे १३ कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याच्या आरोपाची SIT किंवा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पुण्यात महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाची बैठक संपन्न; बिदर-भालकीसह सीमाभागाच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा

Spread the love  पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला पुन्हा वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, पुणे विभागाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *