








बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त ‘नमामी भारत – एक समय, एक लय, एक स्वर या भावनेतून एकत्र येऊया’ या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौरभ कुलकर्णी उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, व्यवस्थापन सदस्य कृष्णा भट्ट, अशोक शिंत्रे, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, पालक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वागतपर भाषण व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’चे भावपूर्ण आणि देशभक्तिपर सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या एकसुरातील सादरीकरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
प्रमुख पाहुणे सौरभ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना ‘वंदे मातरम्’चे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व, राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि सामाजिक ऐक्य याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. एकता, देशभक्ती आणि मातृभूमीविषयी अभिमानाची भावना जागविणारा हा कार्यक्रम संत मीरा स्कूलच्या आवारात संस्मरणीय ठरला.

Belgaum Varta Belgaum Varta