बेळगाव : मराठी भाषेतील फलकांच्या वापराबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या तक्रारीची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून, संबंधित विभागांना शासनाच्या नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. समितीने ३ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करून बेळगाव शहर, बेळगाव, खानापूर, निपाणी आणि अथणी तालुक्यातील शासकीय कार्यालये तसेच स्थानिक …
Read More »बडेकोळ मठाजवळ ट्रक पलटी; बॅरिकेड्स उभारण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बडेकोळ मठाजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. मुसळधार पावसामुळे घसरड्या झालेल्या रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने एक मालवाहू ट्रक पलटी झाला. या अपघातामुळे पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पलटी झालेला ट्रक हटविण्याचे …
Read More »सेवानिवृत्ती विशेष लेख : विद्यार्थीप्रिय शिक्षक एस. डी. पाटील सर
सन 1988 मध्ये शिक्षकी पेशात पदार्पण केलेल्या श्री. एस. डी. पाटील सरांनी आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक विद्यार्थी घडवले. विषयाचे सखोल ज्ञान, विद्यार्थीप्रिय स्वभाव आणि शिस्तप्रिय अध्यापनशैलीमुळे ते विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही लोकप्रिय आहेत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले एस. डी. पाटील सर हे आपल्या शिक्षकी पेशातून दि. 31 जुलै 2026 …
Read More »मैत्रीची साक्ष… आमचा सच्चा मित्र ‘विनू’…
“मित्र वनव्यातील गारव्यासारखा…” आमचे आणि विनोदचे नातेही अगदी असेच होते. तो आमच्यासाठी विनोद भागवत नव्हता, तर आमचा लाडका ‘विनू’ होता. महाद्वार रोडवरील आमच्या मित्रपरिवाराचा तो जणू श्वासच होता. गेल्या ३५ वर्षांपासून जपलेली आमची मैत्री म्हणजे जन्मोजन्मीच्या नात्याची साक्षच होती. विनू म्हणजे मित्र, सखा, सोबती, मार्गदर्शक… प्रसंगी हक्काचा लहान भाऊ, …
Read More »ऋणनिर्देश विशेष : भागवत कुटुंबाचा आधारवड हरपला….
“जो आवडे सर्वांना, तोच आवडे देवाला…” या उक्तीप्रमाणे कै. विनोद प्रकाश भागवत यांच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांचे अचानक झालेले निधन मनाला कायमचा चटका लावून गेले. पत्नी नगरसेविका नेत्रावती भागवत आणि मुलांसोबत आदल्या दिवशी रात्रीपर्यंत ते आनंदाने वेळ घालवत होते. कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या; मात्र नियतीने दुसऱ्याच …
Read More »मराठा मंडळच्या तीन शाळांमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; 1988 च्या माजी विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान
बेळगाव : मराठा मंडळ हायस्कूल (चव्हाट गल्ली), मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल आणि जिजामाता हायस्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सेंट्रल हायस्कूलच्या 1988 सालच्या माजी विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे गुरुजनांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः…” या श्लोकाचा उल्लेख करत मानवी जीवनातील गुरुचे …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्यावतीने २३ ऑगस्ट रोजी मराठी व्याकरण, हस्ताक्षर व निबंध स्पर्धांचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीत संस्थेच्या आगामी शैक्षणिक व भाषिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण व्हावे, भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा तसेच लेखन व अभिव्यक्ती क्षमता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने २३ …
Read More »बेळगावात शेतकऱ्यांचा एल्गार; ‘दुष्काळ जाहीर करा, शेतकरी वाचवा’च्या घोषणांनी शहर दणाणले
बेळगाव : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे वाढते नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बेळगावात हजारो शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्याध्यक्ष वासुदेव मेटी, प्रा. एम. डी. नंजुंडस्वामी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, महिला शेतकरी …
Read More »पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी बेळगावात २०० मीटर परिसरात जमावबंदी; ६१ केंद्रांवर २ ऑगस्टला परीक्षा
बेळगाव : राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, ३,३९५ सिव्हिल पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी येत्या २ ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांभोवती जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ६१ …
Read More »बेळगावला दररोजची विमानसेवा पुन्हा सुरू करा; केंद्रीय मंत्र्यांकडे खासदार जगदीश शेट्टर यांची मागणी
बेळगाव : बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजारापू यांची भेट घेऊन बेळगाव–बंगळुरू आणि बेळगाव–नवी दिल्ली या मार्गांवरील इंडिगोची दैनंदिन विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. शेट्टर यांनी मंत्र्यांना सांगितले की, १६ जून २०२६ पासून इंडिगोने बेळगाव–बंगळुरू मार्गावरील विमानसेवा आठवड्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta