Sunday , September 20 2026
Breaking News

अनगोळ नाक्याजवळ बोरगावच्या तरुणाचा बस-दुचाकी अपघातात जागीच मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या २५ वर्षीय तरुणाचा बस आणि दुचाकीच्या भीषण धडकेत जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी अनगोळ नाक्याजवळ घडली.

सुनील पाटील (वय २५, रा. बोरगाव, ता. निपाणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील कामानिमित्त अनगोळ येथे वास्तव्यास होता. गणपती मूर्तीच्या सजावटीसाठी साहित्य खरेदी करण्याकरिता तो दुचाकीवरून जात होता.

अनगोळ नाक्याजवळ त्याच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या बसशी जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की सुनीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कॅम्प रहदारी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने बोरगावसह अनगोळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *