Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

बिजगर्णी हायस्कूलचे क्रीडांगण उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज

  बिजगर्णी : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय स्पर्धां उद्यापासून बिजगर्णी हायस्कूलच्या पटांगणावर होत आहेत. पहिल्यांदाच बेळगाव पश्चिम ग्रामीण भागातील सतरा माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत. बेळगुंदी क्लस्टर व हिंडलगा क्लस्टर एकत्रितपणे या क्रीडा गंणावर विविध खेळांचा थरार पहायला मिळणार आहे. सांघिक कबड्डी, खो- खो, हाॅलीबाॅल, थ्रोबाॅल, वैयक्तिक …

Read More »

गुरु पौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

      बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात गुरुपौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मय मिशनच्या स्वामिनी प्रज्ञानंदजी, डॉ जयतीर्थ कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, मुख्याध्यापिका सुजाता दप्तदार व्यासपीठावर उपस्थित होते . प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते ओंकार …

Read More »

साखरेच्या दराने गाठली पन्नाशी; श्रावणात गोडवा झाला महाग, सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार

  बेळगाव : साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसू लागला आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ४९ ते ५२ रुपये इतका झाला असून, अवघ्या पंधरा दिवसांत सातत्याने दरवाढ झाल्याने दैनंदिन वापरातील चहासह गोड पदार्थही महागले आहेत. त्यामुळे महिन्याचे घरगुती बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, घाऊक बाजारात …

Read More »

कवयित्री सौ. स्मिता किल्लेकर यांच्या ‘गंध मातीचा’ काव्य कार्यक्रम शनिवारी 

  साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे ; शब्दगंध कवी मंडळ संघाचे आवाहन बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘गंध मातीचा’ हा कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी …

Read More »

श्री स्वामी समर्थ आराधना केंद्रात गुरु पौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न

    बेळगाव : महाद्वार रोड येथील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्रात गुरु पौर्णिमेच्या पावन निमित्ताने बुधवारी (दि. २९ जुलै) विविध धार्मिक कार्यक्रमांनी युक्त गुरु पौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने श्री स्वामी समर्थ अभिषेक व पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेदमंत्रांच्या मंगल घोषात संपन्न झालेल्या अभिषेक …

Read More »

मुक्तांगण विद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी

  बेळगाव : आदर्श गुणविकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय, भाग्यनगर येथे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मराठा मंडळाचे निवृत्त मुख्याध्यापक नारायण बाळेकुंद्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हर्षिता हुगी यांनी स्वागत करून केली. त्यानंतर रोहित बजंत्री यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी रितिका …

Read More »

एक्सलंट योगा क्लासेसतर्फे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी

  बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेसतर्फे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी योगगुरू एस. बी. कुलकर्णी यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात गुरु पौर्णिमेचे महत्त्व विशद करणारी भाषणे अनंत लाड, संगीता बागी …

Read More »

मीटरनुसारच धावणार शहरातील ऑटो रिक्षा; 15 दिवसांत नियमांची कडक अंमलबजावणी

  बेळगाव : शहरातील ऑटो रिक्षा सेवा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व ऑटो रिक्षा पुढील 15 दिवसांच्या आत अनिवार्यपणे मीटरनुसार चालविण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात …

Read More »

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची विविध गणेश मूर्तीशाळांना भेट

  विसर्जन मिरवणुकीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पोलीस आयुक्तांची ‘ॲक्शन प्लॅन’ मोहीम बेळगाव : गणेशोत्सवा दरम्यान विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी वेळेत दूर व्हाव्यात आणि मिरवणुकीचा कालावधी कमी व्हावा, या उद्देशाने बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे अत्यंत सक्रिय झाले आहेत. काल, मंगळवार दिनांक २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी …

Read More »

बेळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! राकसकोप जलाशय अखेर ओव्हरफ्लो

  पाणीपुरवठा सुरळीत होण्याची आशा बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव शहराची तहान भागवणारा राकसकोप जलाशय अखेर बुधवारी ओव्हरफ्लो झाला. यामुळे शहरातील पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात दूर होण्याची चिन्हे असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे राकसकोप जलाशयाची पाणीपातळी चिंताजनकरीत्या घटली होती. जलाशयाने तळ गाठल्याने …

Read More »