ग्रामसभेचा निर्णय; वाढते गैरप्रकार, अस्वच्छता आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर कठोर पाऊल बेळगाव : बेळगाव शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हजगोळी येथील निसर्गरम्य चाळोबा टेकडी परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पर्यटकांची वाढती गर्दी, त्यातून होणारे गैरप्रकार, ग्रामस्थांना होणारा त्रास तसेच वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेऊन ग्रामसभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय …
Read More »कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना महेश फाउंडेशनकडून स्कूल बॅगचे वाटप
बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा उपक्रम महेश फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या ५० विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करून संस्थेने शिक्षणप्रेमी सामाजिक बांधिलकी जपली. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच शैक्षणिक साहित्याच्या खर्चामुळे पालकांवर येणारा आर्थिक ताण काही …
Read More »सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात
बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 2026 -27 या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभोत्सव अनोख्या पद्धतीने, बैलगाडीतून सरस्वती मातेचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. पारंपारिक ढोल आणि झांज पथकाच्या गजरात नूतन विद्यार्थ्यांची प्रभात फेरी सजवलेल्या बैलगाडीतून काढण्यात आली. …
Read More »कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात
बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. कोणी पोलीस, कोणी सैनिक, डॉक्टर, शिक्षक त्याचबरोबर शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यासारख्या विविध पारंपारिक वेशात इयत्ता पहिलीचे विद्यार्थी …
Read More »येळ्ळूर येथील मराठी मॉडेल शाळेला कर्नाटक पब्लिक शाळेचा (KPS) दर्जा प्राप्त
बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला कर्नाटक सरकारकडून कर्नाटक पब्लिक स्कूलचा दर्जा देण्यात आला आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून कर्नाटक पब्लिक स्कूलचा शुभारंभ आज करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष एस.डी.एम.सी. विद्यमान अध्यक्षा सौ. दिव्या संदीप कुंडेकर होत्या. त्याच बरोबर शाळेचे माजी एसडीएमसी अध्यक्ष डी. जी. पाटील, माजी …
Read More »बेळगाव पोलिसांची धडक कारवाई; जुगार, मटका आणि गांजा प्रकरणात १० जण ताब्यात
बेळगाव : शहरातील बेकायदेशीर कारवायांवर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम राबवत जुगार, मटका आणि गांजा सेवनाविरोधात धडक कारवाई केली. या मोहिमेत एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहापूर पोलिसांनी बळ्ळारी नाल्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून धनराज ऊर्फ …
Read More »पीएसआय, डीवायएसपी यांची नावे लिहून व्यक्तीची आत्महत्या
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील बेंडीगेरी गावात एका व्यक्तीने पीएसआय, डीवायएसपीसह काही जणांची नावे पत्रात नमूद करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृताची ओळख रवींद्र दानव्वगोळ अशी झाली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात आपणास जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी नमूद केल्याचे …
Read More »व्हॅक्सिन डेपो प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न
बेळगाव : समर्थ भारत प्रतिष्ठान च्या वतीने सुभाष चंद्र नगरचे रहिवासी आणि उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि सुरज नेतलकर यांनी आज सकाळी वॅक्सीन डेपो परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्या भागात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या व इतर विखुरलेले साहित्य पाहून आप्पासाहेब गुरव व नेतलकर यांनी ते जमा करण्याचा प्रयत्न …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनांना शिवसेना (उबाठा)चा जाहीर पाठिंबा
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय पाठबळ मिळू लागले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नड भाषा फलक सक्तीविरोधात २२ जून रोजी बेळगाव …
Read More »माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स्व. सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त श्री गणेश मंदिरात विशेष प्रार्थना
बेळगाव : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, साधेपणा, विनम्रता आणि जनसामान्यांशी कायम नाळ जपणारे लोकप्रिय नेते स्वर्गीय सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त आज बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथील श्री गणेश मंदिरात विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. सुरेश अंगडी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करत कर्नाटकाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta