Sunday , September 20 2026
Breaking News

भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

Spread the love

 

 

लिखित परिक्षेत शहरातील 7,800 विद्यार्थ्यांचा सहभाग

बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने रविवार दि. 6 रोजी आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. तत्पूर्वी झालेल्या लिखित परिक्षेत शहरातील 28 शाळांच्या 7,800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य व्ही. एन्. जोशी व पांडुरंग नायक गौरव अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण वंदे मातरम् गायनाने झाली. मंगल कुलकर्णी यांनी प्रार्थना सादर केली. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्वाती घोडेकर यांनी “भारत को जानो” स्पर्धेविषयी विस्तृत विवेचन केले. प्रा. प्रतिभा हल्लेप्पनवर यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उत्कृष्ट संचलन केले. पवित्रा हल्लेप्पनवर यांनी तांत्रिक बाजू योग्यपणे सांभाळली. प्रांत संघटन सचिव विनायक घोडेकर, रामचंद्र तिगडी आणि पी. जे. घाडी यांनी स्कोअरर म्हणून चोख कामगिरी बजावली.
स्पर्धेत वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक – के. एल. एस. स्कूल, द्वितीय क्रमांक – ज्योती सेंट्रल स्कूल, तृतीय क्रमांक – अमृता विद्यालयम्, विशेष पारितोषिके महिला विद्यालय प्रभाताई देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल व जी. जी. चिटणीस स्कूल यांनी प्राप्त केली. त्याचप्रमाणे कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक – अमृता विद्यालयम्, द्वितीय क्रमांक – एम्. व्ही. हेरवाडकर स्कूल, तृतीय क्रमांक – जी. जी. चिटणीस स्कूल, विशेष पारितोषिके के. एल. एस. स्कूल आणि बालिका आदर्श विद्यालय यांनी पटकावली. दोन्ही गटातील प्रथम क्रमांक प्राप्त संघांची सिंधनूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
तत्पूर्वी ८ दिवसांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय सामान्यज्ञान लिखित परीक्षेत शहरातील 28 शाळांमधील 7,800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ज्ञान प्रबोधन मंदिर, ज्योती सेंट्रल स्कूल, एम्. व्ही. हेरवाडकर स्कूल, के. एल. एस. स्कूल, एम्. व्ही. एम्. प्रभाताई देशपांडे स्कूल, महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूल, अमृता विद्यालयम्, संत मीरा स्कूल अनगोळ, संत मीरा स्कूल हिंडलगा, मुक्तांगण विद्यालय, सरस्वती गर्ल्स हायस्कूल, ठळकवाडी हायस्कूल, स्वाध्याय विद्यामंदिर, बालिका आदर्श विद्यालय, व्ही. एम्. शानभाग स्कूल, एम. आर. भंडारी स्कूल, बी. के. मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल, व्ही. एन. शिवणगी स्कूल, जी. जी. चिटणीस स्कूल, शारदा विद्यालय, भरतेश इंग्लिश मिडीयम स्कूल, गोमटेश मराठी माध्यम स्कूल, गोमटेश कन्नड माध्यम शाळा, गोमटेश इंग्रजी माध्यम स्कूल, प्रेशियस ब्लॉसम्स हायस्कूल, लिटल स्कॉलर्स स्कूल, वासुदेव घोडके इंग्रजी माध्यम स्कूल या शाळांनी अखिल भारतीय सामान्यज्ञान परीक्षेत सहभाग दर्शविला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *