
बेळगाव : श्री संत सेना महाराज ग्रामीण सार्वजनिक नाभिक समाज सुधारणा संघ, हिंडलगा (ता. जि. बेळगाव) यांच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव मंगळवारी, दि. ८ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
सुळगा-हिंडलगा येथील सांस्कृतिक भवनात सकाळी ८ वाजता श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सकाळी ९ वाजता महिला भजनी मंडळ, सुळगा-हिंडलगा यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला.
दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, समाजातील सर्व बांधवांनी वेळेत उपस्थित राहून पुण्यतिथी उत्सवात सहभागी व्हावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत सेना महाराज ग्रामीण सार्वजनिक नाभिक समाज सुधारणा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
केस कटिंगची सर्व दुकाने बंद राहणार
श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी, दि. ८ सप्टेंबर रोजी नाभिक समाजातील सर्व केस कटिंगची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहक बांधवांनी याची नोंद घ्यावी, असेही हिंडलगा नाभिक समाजाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta