बेळगाव : कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्त मंदिर परिसरात भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली असून, हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्रावणातील अखेरच्या सोमवारनिमित्त कणबर्गी गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी काढण्यात आलेल्या पारंपरिक …
Read More »बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे प्रकल्पाला ग्रहण; राज्य सरकारवर जगदीश शेट्टर यांचा हल्लाबोल
बेळगाव : बेळगाव-कित्तूर-धारवाड या महत्त्वाकांक्षी नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या कामाला निधीअभावी मोठा फटका बसत असून, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्याचा गंभीर आरोप खासदार जगदीश शेट्टर यांनी केला आहे. राज्य सरकारकडून अपेक्षित इच्छाशक्ती दाखविली जात नसून आवश्यक निधीच्या वितरणास होत असलेल्या विलंबामुळे या महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पाचे काम …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक बुधवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. …
Read More »बेळवट्टी येथे ज्ञानज्योती सहकारी व समाजसेवा संघाचा उद्घाटन सोहळा संपन्न
बेळवट्टी : समाजसेवा आणि सहकार क्षेत्राच्या वृद्धीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ज्ञानज्योती समाजसेवा संघ आणि ज्ञानज्योती सहकारी संघ यांच्या दुहेरी उद्घाटनाचा सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योती सहकारी संघाचे चेअरमन सातेरी चौगुले होते. ज्येष्ठ नागरिक गणपत देसाई, रामू पाटील, मधुकर देसाई, संदीप मजुकर आणि मनोहर सांबरेकर यांच्या …
Read More »सोगल सोमनाथ येथे श्रावणातील शेवटचा सोमवार भक्तिभावात
शिवमय वातावरणात निसर्गाचा जलाभिषेक; जोरदार पावसाने मंदिर परिसर जलमय, भक्तांची मोठी गर्दी सोगल : श्रीक्षेत्र सोगल सोमनाथ येथे श्रावण मासातील शेवटचा सोमवार अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच सोमनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून …
Read More »तारांगणच्या कलाविष्कारातून दिला सामाजिक संदेश
ओवी, भारूड, मंगळागौर, फॅशन शो आणि ग्रुप डान्सने कार्यक्रमात रंगत बेळगाव : ओवी, भारूड, मंगळागौरीचे खेळ, फॅशन शो आणि ग्रुप डान्स अशा विविधरंगी कलाप्रकारांच्या सादरीकरणातून ‘तारांगण’चा कलाविष्कार जल्लोषात साजरा झाला. मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला महिलांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अम्फी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर निधी कामत, सामाजिक …
Read More »नेताजी मल्टीपर्पज सोसायटीची वार्षिक उलाढाल 68 कोटींवर
चेअरमन : डी. जी. पाटील : वार्षिक सभा उत्साहात येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को. ऑप सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नेताजी कार्यालयाच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डी जी पाटील होते. सुरुवातीला सोसायटीच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेताजींच्या प्रतिमेचे पूजन डी जी …
Read More »मोठी स्वप्ने पाहून ती साकारण्यासाठी सातत्याने मेहनत करा : अनंत लाड
बेळगाव : विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे व सातत्याने मेहनत करावी. वेळेचे महत्त्व ओळखून शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार आत्मसात करावेत. यश मिळविण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून मेहनत, शिस्त, आत्मविश्वास, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाचीही आवश्यकता असते, असे प्रतिपादन पायोनियर अर्बन बँकेचे संचालक तथा पत्रकार अनंत लाड …
Read More »पत्रकारांच्या सुरक्षेसाठी DNA आक्रमक; दिल्ली-पुण्यातील कथित घटनांची चौकशी करण्याची मागणी
बेळगाव : दिल्ली आणि पुणे येथे पत्रकारिता करत असताना महिला व पुरुष पत्रकारांना कथितरीत्या झालेल्या मारहाण, धमकी, छळ आणि कामात अडथळा आणण्याच्या घटनांचा Digital News Association (DNA), Belagavi यांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी DNAच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात …
Read More »बंद घर फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास
रामतीर्थ नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; तीन किलो चांदीसह ५० हजारांची रोकड चोरी बेळगाव : रामतीर्थ नगर येथे बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी सुमारे सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचे चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, वाढत्या घरफोड्यांमुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta