Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : शहरवासीयांची तहान भागविणारा राकसकोप जलाशय आता तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी जलाशयाच्या पाणीपातळीत आणखी एक फुटाची वाढ झाल्याने जुनी २४७० फूट पातळी पूर्ण झाली असून, आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघ्या साडेचार फूट पाण्याचीच आवश्यकता आहे. …

Read More »

35 वर्षांची अखंड परंपरा; विठूनामाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात

  टाळ-मृदुंगाचा निनाद, पारंपरिक दिंडी, भजन-कीर्तन आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने परिसर भक्तिमय बेळगाव : “विठू माऊली तू माऊली, जगाची माऊली…” या अभंगाच्या स्वरांसह “ज्ञानोबा… तुकाराम… माऊली…” च्या अखंड गजराने महाद्वार रोड, तिसरा क्रॉस येथील श्री ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर शनिवारी भक्तिरसाने ओथंबून गेला. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेला धार्मिक …

Read More »

टाळ-मृदुंगाच्या गजरात मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

  चिमुकल्यांच्या दिंडी, संतांच्या वेशभूषा, भजन-कीर्तन व सामूहिक नृत्याने रंगला भक्तिमय सोहळा बेळगाव : टाळ-मृदुंगाच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेतील चिमुकल्यांची दिंडी आणि भजन-कीर्तनाच्या सुरांनी मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जणू संतांची मांदियाळीच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला. आषाढी एकादशीचा सोहळा शाळेत अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत …

Read More »

आषाढी एकादशी निमित्त शिवसेना व आर्यन फाउंडेशनच्या वतीने विठ्ठल-रखुमाई महापूजा

बेळगाव : आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर बेळगाव जिल्हा शिवसेना व आर्यन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने खडेबाजार येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली. यावेळी उत्तम पिकपाण्यासहीत शेतकरी आणि सर्व जनतेच्या सुखसमृद्धीसाठी विठ्ठलचरणी साकडे घालण्यात आले. तसेच उपस्थित भाविकांसाठी फळवाटप …

Read More »

सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

  मच्छे : सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी एस डी एम सी सदस्य श्री. अमोल लाड यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी टाळ, अभंग व भक्तिगीतांच्या साथीने दिंडी काढली. …

Read More »

समाजसेवक जयवंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते ५० विद्यार्थिनींना गणवेशांचे वितरण

  बेळगुंदी : विश्व भारत सेवा समिती संचलित व्ही.बी.एस.एस. गर्ल्स हायस्कूल, बेळगुंदी येथे समाजसेवक जयवंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते शाळेतील ५० गरजू विद्यार्थिनींना गणवेशांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम. वाय. पाटील होते. यावेळी बोलताना जयवंत बाळेकुंद्री यांनी, “विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे तसेच आपल्या परिसरातील मुलींमध्ये …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त सरस्वती विद्यामंदिर किणये शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली पायी दिंडी

  बेळगाव : किणये येथील सरस्वती विद्यामंदिर, किणये शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व विठू-माऊली महिला मंडळ हरीपाठ किणये यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. विठ्ठल रखुमाई तसेच तुकाराम महाराज, सोपानदेव, …

Read More »

कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत अभंग गायन स्पर्धा उत्साहात

  बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सण असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव आणि संतांचे संस्कार रुजवणे, गायन कलेला प्रोत्साहन देणे,मराठी भाषा व साहित्याची गोडी निर्माण करणे,आत्मविश्वास वाढवणे तसेच आपला सांस्कृतिक …

Read More »

आषाढीच्या वारीत घुमला सीमाप्रश्नाचा गजर; पांडुरंगाला पुणे विभाग समितीच्या वतीने सीमाप्रश्नी साकडे

  पुणे : सीमाभागातून पुणे येथे स्थायिक झालेल्या कार्यकर्त्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पांडुरंग चरणी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी साकडे घातले. यावेळी पांडुरंगाकडे प्रार्थना करतांना कार्यकर्त्यांनी सीमाभागात मराठी माणसावर कन्नडसक्ती करून मराठी संस्कृती पुसणाऱ्या कर्नाटकी प्रशासनाला सदबुद्दी द्यावी अशी प्रार्थना केली. त्याच बरोबर 1956 पासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

डॉ. बी. डी. जत्ती शिक्षा महाविद्यालयाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात

  बेळगाव : डॉ. बी. डी. जत्ती शिक्षा महाविद्यालयात नुकताच महाविद्यालयाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी स्वरूपा सिंग यांच्या सुंदर आवाजात वंदे मातरम राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा कर्नाटक धारवाडचे कार्याध्यक्ष श्री. इरेश बी. अचंटगेरी होते. द.भा. हिंदी प्रचार सभा धारवाड कर्नाटक …

Read More »