Sunday , September 20 2026
Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २४ तास पाणी नळजोडणीला ‘ब्रेक’

Spread the love

 

खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी कंत्राटदारांची लगबग; उत्सवानंतर पुन्हा कामाला सुरुवात

बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या नऊ-दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नळजोडणीच्या कामाला तात्पुरता ‘ब्रेक’ देण्यात आला आहे. एल अँड टी कंपनीकडे नळजोडणीचे कंत्राट असून विविध भागांत नळजोडणीचे काम सुरू होते. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या काम थांबवून खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत करण्याची लगबग सुरू झाली आहे.

कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड परिसरात नळजोडणीचे काम करण्यात आले आहे. नळजोडणीसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची तसेच गणेशभक्तांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन खोदलेल्या भागात चिपिंग टाकून रोलरच्या साहाय्याने रस्ते तात्पुरते सुव्यवस्थित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

महाद्वार रोड परिसरातील सर्वच भागांत अद्याप २४ तास पाणीपुरवठ्यासाठी नळजोडणी झालेली नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात काम अपूर्ण ठेवण्यात येणार असून उत्सव संपल्यानंतर पुन्हा नळजोडणीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरवस्था नागरिकांसाठी त्रासदायक ठरू नये, यासाठी कंत्राटदारांकडून सध्या खोदकाम केलेले भाग बुजविण्याची आणि रस्ते वाहतुकीयोग्य करण्याची लगबग सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *