
बेळगाव : ३३ केव्ही जीआयएस श्रीनगर येथे तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या नियोजित वीजपुरवठा खंडितमध्ये श्रीनगर, अंजनेय नगर, महांतेश नगर, शिवाजीनगर, चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर परिसर, अंजनेयनगर परिसर, महांतेश नगर सेक्टर क्रमांक ८, ९, १०, ११ व १२, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड परिसर तसेच एसबीआय ते धर्मनाथ भवन परिसर यांचा समावेश आहे.
तसेच अशोकनगर, कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआय हॉस्पिटल, वीरभद्रनगर, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, केएसआरटीसी क्वार्टर्स, त्रिवेणी हॉटेल, मेटगुड हॉस्पिटल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, काकतीवेस, वेस्ट क्लब रोड, डीसी कार्यालय व न्यायालय परिसर येथेही वीजपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
११० केव्ही सुवर्णसौध वितरण केंद्रांतर्गत येणारे सर्व फिडर्स व परिसर, तसेच अलारवाड, केएचबी कॉलनी, वृद्धाश्रम परिसर, शहापूर, जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, गणेशपूर, पवार गल्ली, बसवान गल्ली, सराफ गल्ली, बिच्छू गल्ली आदी भागांतही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज वितरण विभागाकडून करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta