Sunday , September 20 2026
Breaking News

कच्ची दारू विक्रीप्रकरणी एकाला अटक; २० लिटर कच्ची दारू जप्त

Spread the love

 

बेळगाव : मच्छे गावच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी कच्ची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २० लिटर कच्ची दारू जप्त केली.

परशुराम बसाप्पा नाईक (३५, रा. वाल्मिकी नगर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ४ सप्टेंबर रोजी तो मच्छे गावच्या हद्दीत स्वतःच्या फायद्यासाठी कच्ची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी थांबला होता. याची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय विनोदकुमार सरनाईक व कर्मचाऱ्यांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीकडून सुमारे २० लिटर कच्ची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०६/२०२६ अन्वये कर्नाटक अबकारी कायदा १९६५ मधील कलम ३२ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अवैध दारूविक्रीविरोधात केलेल्या या कारवाईबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी संबंधित पोलिसांचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *