Sunday , September 20 2026
Breaking News

शिक्षक शंकर सिताराम चव्हाण यांचा प्रोत्साह फाउंडेशनकडून सन्मान

Spread the love

 

बेळगाव : शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक शंकर सिताराम चव्हाण यांचा प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम खरोखरच वाखाणण्याजोगे असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी आनंदनगर, वडगाव येथे प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाजातील गुणवंत व निष्ठावंत शिक्षकांची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्रोत्साह फाउंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमणी सर यांनी पुष्पगुच्छ देऊन शिक्षक शंकर सिताराम चव्हाण यांचे स्वागत व अभिनंदन केले.
या प्रसंगी फाउंडेशनचे पदाधिकारी भीमराव पवार सर, सागर कित्तूर सर, हिरालाल चव्हाण, प्रदीप मजुकर, संजय चौगुले, पी. जी. घाडी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी चव्हाण यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *