Sunday , September 20 2026
Breaking News

इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्या चार कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट प्रदान

Spread the love

 

बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेतर्फे आयोजित कराटे बेल्ट परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट पटकावला. शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी तहसीलदार गल्ली येथील श्री सोमेश्वर मंदिराच्या कार्यालयात ही परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेत एकूण ७५ कराटेपटूंनी विविध कलर बेल्टसाठी सहभाग घेतला. त्यामधून वर्धन चौगुले, सायली गुंडकल, समीक्षा गुंडकल आणि जानवी मासमर्डी या चार विद्यार्थ्यांची ब्लॅक बेल्टसाठी निवड झाली.
हे चारही विद्यार्थी गेल्या आठ वर्षांपासून कराटे प्रशिक्षक विनायक दंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव करीत आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये सहभागी होत विविध पदके मिळवली आहेत.
इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते चारही विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोनाली सरनोभा, किरण जाधव, मिलिंद भटकंडे आणि राजेश गजानन शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परशुराम काकती, प्रभाकर किल्लेकर, विठ्ठल भोजगार, श्रेया येळूरकर, सिद्धार्थ तहसीलदार, अमिषा होणगेकर, सात्विक शानभाग, वैष्णवी होणगेकर आणि तेजस्विनी देसाई यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन (पिंटू) भरमा पाखरे सर यांनी केले.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *