
चेअरमन : डी. जी. पाटील : वार्षिक सभा उत्साहात
येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को. ऑप सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नेताजी कार्यालयाच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डी जी पाटील होते. सुरुवातीला सोसायटीच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेताजींच्या प्रतिमेचे पूजन डी जी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर दिपप्रज्वलन व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे, युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, सेक्रेटरी के एन पाटील, संचालक संजय मजुकर, प्रा. सी एम गोरल, रवींद्र गिंडे सह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. सी एम गोरल यांनी केले.
यावेळी बोलताना चेअरमन डी जी पाटील म्हणाले, सभासदांच्या विश्वासावर संस्थेने गेल्या 25 वर्षात चांगली प्रगती साधली असून, संस्थेच्या येळ्ळूर व वडगाव येथे स्वतःच्या इमारती आहेत. संस्थेने आर्थिक व्यवहाराबरोबरच येळ्ळूर येथे मराठी सांस्कृतिक भवनची निर्मिती केली असून, प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडले आहेत असे सांगितले. व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी संस्थेची वार्षिक उलाढाल 68 कोटीवर गेली असून, गुंतवणूक 4 कोटी, ठेवी 32 कोटी, कर्जे 20 कोटी 60 लाख, भाग भांडवल 47 लाख रुपये असून संस्थेला आर्थिक वर्षात 4 लाख 50 हजारांचा नफा झाला आहे, असे सांगितले. ताळेबंद पत्रकाचे वाचन सेक्रेटरी दीपक हट्टीकर यांनी केले. तर नफा तोटा पत्रकाचे वाचन चांगदेव मुरकुटे यांनी केले. यावेळी रघुनाथ मुरकुटे, के एन पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी संचालक संजय मजुकर, रवींद्र गिंडे, प्रा. सी एम गोरल, कल्लप्पा बंडाचे, मीनाजी नाईक, भोमाणी छत्र्यान्नावर, चांगुणा मुरकुटे, परशराम गिंडे, गणपती हट्टीकर, शंकर मुरकुटे, अनिल पाटील, प्रभाकर कणबरकर, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, जोतिबा गोरल, वसंत मुचंडी, कांचन पाटील, कल्याणी पाटील, रवींद्र कणबरकर, ज्योती यरमाळकर, सोनाली सायनेकर, संगीता दणकारे यांच्यासह सभासद व भागधारक उपस्थित होते. शेवटी संजय मजुकर यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta