Sunday , September 20 2026
Breaking News

बेळवट्टी येथे ज्ञानज्योती सहकारी व समाजसेवा संघाचा उद्घाटन सोहळा संपन्न

Spread the love

 

बेळवट्टी : समाजसेवा आणि सहकार क्षेत्राच्या वृद्धीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ज्ञानज्योती समाजसेवा संघ आणि ज्ञानज्योती सहकारी संघ यांच्या दुहेरी उद्घाटनाचा सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योती सहकारी संघाचे चेअरमन सातेरी चौगुले होते. ज्येष्ठ नागरिक गणपत देसाई, रामू पाटील, मधुकर देसाई, संदीप मजुकर आणि मनोहर सांबरेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी महालक्ष्मी पूजन सौ. निशा निंगाप्पा भोगण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महादेव नलावडे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गणपत देसाई, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन गोपाळ देसाई, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. प्रभा नलावडे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पांडुरंग मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यालयाचे पूजन सौ. पूजा नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयाचे उद्घाटन आर. बी. देसाई, संघाचे उद्घाटन एन. एस. गाडेकर, फलकाचे अनावरण व्ही. एस. चांदिलकर तसेच संगणक पूजन आर. के. ओऊळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्ञानज्योती सहकारी संघाच्या चेअरमनपदी सातेरी चौगुले व व्हाईस चेअरमनपदी के. डी. पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच ज्ञानज्योती समाजसेवा संघाच्या अध्यक्षपदी दयानंद देसाई, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर चौगुले आणि सचिवपदी जनार्दन पाटील यांची निवड करण्यात आली.

प्रमुख अतिथी आर. के. ओऊळकर यांनी संस्थेच्या कार्याबाबत तसेच सहकार क्षेत्राच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन करत आपले विचार व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे संचालक एन. एस. गाडेकर, टी. के. कांबळे, निंगाप्पा भोगण, मधू नलावडे, नितीन पाटील, सुधा तुकाराम मजुकर, विठ्ठल देसाई, रवळू राऊत, काळू थोरवत आणि जानू पाटील यांच्यासह सभासद व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. डी. पाटील यांनी केले. आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर डी. एन. देसाई यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *