Sunday , September 20 2026
Breaking News

जायन्ट्स सखीच्या ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कारासाठी पाच शिक्षिकांची निवड

Spread the love

 

बेळगाव : जायन्ट्स क्लब ऑफ बेळगाव सखीच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची परंपराही जायन्ट्स सखीने जपली आहे. याच उपक्रमांतर्गत शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाच शिक्षिकांची ‘आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षिकांमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा, कॅम्पच्या सौ. नीता केदारी गुंजीकर, वनिता विद्यालय मराठी हायस्कूलच्या सौ. भाग्यश्री मोहनदास पाटील, उच्च प्राथमिक शाळा, कुंभार्डा (ता. खानापूर) येथील सौ. विद्या जनार्दन नरुटे, मराठी विद्यानिकेतच्या चित्रकला शिक्षिका सौ. लता रावसाहेब नगरे आणि हेरवाडकर हायस्कूलच्या सौ. नीता लाड यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता निर्माण करण्याबरोबरच पाठ्यपुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष कृती व प्रयोगांच्या माध्यमातून समजावून देण्यासाठी या शिक्षिकांनी विशेष प्रयत्न केले आहेत. विविध शैक्षणिक उपक्रमांसह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

विद्यार्थ्यांची केवळ शैक्षणिक प्रगती न पाहता त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देत शिक्षण अधिक आनंददायी आणि कृतीशील करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, प्रश्न विचारण्याची सवय लावणे तसेच दैनंदिन जीवनातील घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी विकसित करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी शांतीनगर येथे आयोजित कार्यक्रमात पाचही शिक्षिकांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री पाटील आणि डॉ. अर्पिता उपस्थित राहणार असून, जायन्ट्स सखीच्या अध्यक्षा सौ. सुलक्षणा शिनोळकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *