Sunday , September 20 2026
Breaking News

गणेश फेस्टिवलतर्फे उद्या बेळगावात नवरत्नांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : श्री माता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री भक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री राजमाता महिला मल्टीपर्पज सोसायटी तसेच ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री गणेश फेस्टिवल बेळगाव’चा सांगता सोहळा बुधवार, दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. यानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नवरत्नांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यावर्षी समाजसेवा, साहित्य, सामाजिक कार्य, श्रमसेवा, संगीत, क्रीडा, कला, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांची नवरत्न म्हणून निवड करण्यात आली आहे.
यामध्ये समाजसेवक रत्न म्हणून श्री. अवधूत तुडवेकर, साहित्यरत्न म्हणून सौ. शोभा नायक, सामाजिक संस्था रत्न म्हणून समर्पण यूथ फाऊंडेशन, श्रमसेवा रत्न म्हणून सौ. आशा पत्रावळी, संगीतरत्न म्हणून श्री. अशोक परांजपे, क्रीडारत्न म्हणून मा. ललिता गवस, कलारत्न म्हणून श्री. अजित औरवाडकर, उद्योगरत्न म्हणून आयडियल प्रॉडक्ट तसेच कृषिरत्न म्हणून श्री. राजू मर्वे यांची निवड करण्यात आली आहे.

या सर्व नवरत्नांचा सत्कार बुधवार, दि. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता श्रीमाता सोसायटी सभागृह, न्यू गुड शेड रोड, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
गणेश फेस्टिवलच्या सांगता सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवरत्नांचा गौरव वाढवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *