Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव काँग्रेसला मिळाले नवे सारथी; ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आला असून, पक्षाच्या ग्रामीण आणि शहर विभागासाठी नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एआयसीसीने बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज शेगावी तर शहर विभागाच्या अध्यक्षपदी राजा सलीम यांची नियुक्ती केली आहे.

पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात काँग्रेसच्या संघटनेला बळकटी देण्याची जबाबदारी बसवराज शेगावी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर बेळगाव शहरातील पक्ष संघटना मजबूत करण्यासह कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्याचे आव्हान राजा सलीम यांच्यासमोर आहे.

नव्या नियुक्त्यांमुळे आगामी काळात बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *