Sunday , September 20 2026
Breaking News

सतीश जारकीहोळींसह निकटवर्तीयांच्या घरांवर दुसऱ्या दिवशीही ईडीची झडती

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली झडती गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली.

सतीश जारकीहोळी यांचे दाजी वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी ईडी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे व विविध माहितीची तपासणी करण्यात येत आहे. तसेच गोकाक येथील सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानीही झडती सुरू आहे.

बेळगाव शहरातील सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय डॉ. गिरीश सोनवळकर तसेच स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील यांच्या निवासस्थानीही ईडीकडून कागदपत्रे व इतर माहितीची तपासणी करण्यात येत आहे.

परदेशातील कथित बेकायदा गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ईडीकडून नेमकी कोणती कागदपत्रे व माहिती तपासण्यात येत आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *