
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणी ईडीकडून सुरू असलेल्या शोधमोहीमेअंतर्गत आता त्यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील यांच्या निवासस्थानावरही छापेमारी करण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील कुमारस्वामी लेआऊट येथील मलगौडा पाटील यांच्या घरावर बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली. जारकिहोळी यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीकडून एकाचवेळी शोधमोहीम सुरू असतानाच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवरही कारवाई करण्यात येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
छापेमारीदरम्यान ईडीचे अधिकारी विविध कागदपत्रे तसेच इतर महत्त्वाच्या माहितीची तपासणी करीत असल्याचे समजते. या कारवाईबाबत अधिकृत तपशीलाची प्रतीक्षा असून, ईडीची शोधमोहीम पुढेही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta