
बेळगाव : मच्छे येथील डिवाईन मर्सी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील झोनल लेव्हल क्रीडा स्पर्धेत येळळूर येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या मुलांच्या व मुलींच्या खो-खो संघांनी प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.
मुलींच्या खो-खो संघात श्रावणी पाटील, रिया पाटील, आरोनी कामानाचे, प्रांजल बेडरे, आरोही टोपकार, आदिती हलगेकर, वैष्णवी नायकोजी, प्रसिद्धी कंग्राळकर, रेखा तारिहाळकर, लक्ष्मी काळूचे, औजस्वी रतन आणि आरती बोकडेकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
मुलांच्या संघात सुशांत हलगेकर, वेदांत मजुकर, सोहम मुचंडी, आरुष मुतगेकर, शिवम हलगेकर, श्रेयश धुळजी, पार्थ हुंडरे, गौतम पाटील, वेदांत हलगेकर, स्वयम नंद्याळकर, योगिश जाधव आणि अथर्व पाटील यांनी उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
या यशासाठी मुख्याध्यापक आय. बी. राऊत, क्रीडा शिक्षक एम. एम. डोंबले, तसेच स्नेहल मजुकर, नंदा मुचंडी, सारिका पाटील, संजीवनी धामणेकर, अंकिता पाटील आणि दिपा हट्टीकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष वाय. एन. मजुकर आणि सचिव प्रसाद मजुकर यांनीही विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल विजयी खेळाडूंचे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच आगामी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

Belgaum Varta Belgaum Varta