Sunday , September 20 2026
Breaking News

लोकप्रिय नाभिक समाजातर्फे संत सेना महाराजांचे पुण्यतिथी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील लोकप्रिय नाभिक समाजातर्फे संत सेना महाराजांची पुण्यतिथी करण्यात आली. त्यानिमित्त आडके प्लॉट येथील राहुल चव्हाण व कपिल चव्हाण यांच्या निवासस्थानापासून संत सेना महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी बेळगाव नाका, जुना पीबी रोड, नगरपालिका, मंगळवार पेठ मार्गे संत सेना भवन येथे नेण्यात आली.
संत सेना भवन येथे संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आरती झाल्यावर महाप्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसादाचा नाभिक समाजातील बंधू-भगिनींनी लाभ घेतला. यावेळी समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह संचालक मंडळ व समाज बांधवांची उपस्थिती होती.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *