Monday , October 5 2026
Breaking News

जितेंद्र रेडेकर यांचा ‘भावनांचे भोळे पक्षी’ कार्यक्रम आणि कवी संमेलनाचे शनिवारी आयोजन

Spread the love

 

 

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘भावनांचे भोळे पक्षी’ हा कवी जितेंद्र रेडेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली सभागृहात करण्यात आले आहे.
जितेंद्र रेडेकर हे कविता आणि नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आजवर १०० हून अधिक कविता तसेच अनेक एकांकिका, बालनाट्ये, दीर्घांक आणि पथनाट्ये लिहिली आहेत. ‘मी चौथरा बोलतोय’, ‘पंडित’, ‘निर्भया’, ‘एक दिवसाचं पांडुरंग’, ‘ईश्वरा’, ‘वृक्षवल्ली’, ‘ऑनलाईन’ या त्यांच्या उल्लेखनीय एकांकिका आहेत. बालनाट्य स्पर्धांमध्ये लेखन-दिग्दर्शनासाठी त्यांना अनेक प्रथम पारितोषिके मिळाली आहेत. तसेच अभिनयासाठी प्रथम पारितोषिक आणि २०१७ मध्ये ‘नाट्यभूषण पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. गेली अकरा वर्षे कॉमन टच प्रोडक्शन्सच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना मोफत अभिनय प्रशिक्षण व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ते कार्यरत आहेत.
या कार्यक्रमात जितेंद्र रेडेकर आपल्या कवितांचे सादरीकरण करणार असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. यावेळी प्रारंभी स्थानिक कवींसाठी खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्यिक कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावचे सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

महात्मा गांधी संस्थेतर्फे क्रीडा प्रशिक्षक व राज्य स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा सन्मान

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे राज्य व राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *