Sunday , October 4 2026
Breaking News

पारदर्शी कारभार केल्यास संस्थेची प्रगती

Spread the love

 

सहकारत्न उत्तम पाटील : बेनाडीत रयत को -ऑप. सोसायटीचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात आर्थिक संस्था सांभाळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी, लहानमोठे उद्योग व्यवसायिक आणि गरजूंना पद निर्माण करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली आहे. भविष्यात विश्वासाला तडा जाऊ न देत पारदर्शी कारभार करावा. रयत को-ऑप. सोसायटीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केला.

बेनाडी येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ रयत को-ऑप. सोसायटीचे उद्घाटन गुरुवारी (ता.२४) दत्त देवस्थान मठाचे परमात्माराज महाराज, निपाणी विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्रणालींग स्वामी आणि वाघापूर येथील सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत झाले आले. त्यावेळी पाटील बोलत होते.
संस्थापक अध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत तर उपाध्यक्ष पुंडलिक ढवणे यांनी प्रास्ताविक केले. परमात्माराज महाराज, सिद्धार्थ ढोणे महाराज, रामलिंग स्वामी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पंकज पाटील, सत्यजित पाटील, सुरेश पाटील, शंकर पोवाडे, कुमार पाटील, ऋतुराज पाटील, अभिजीत पाटील, अमोल पाटील, सतेज पाटील, सविता चौगुले, शिवाजी बाबर, मल्लाप्पा भानसे, शेखर भोसले, अक्षय पाटील यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते. व्यवस्थापक अशोक माळी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरमध्ये सण-उत्सवांची पर्वणी

Spread the love  सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *