Sunday , October 4 2026
Breaking News

गणेश विसर्जनावेळी मच्छे येथे युवकाचा बुडून मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : शहरालगतच्या मच्छे गावात गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. विश्वनाथ नाईक असे मृत युवकाचे नाव आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या विश्वनाथ नाईकने विसर्जनावेळी पाण्यात प्रवेश केला. यावेळी तो पाण्यात बुडाला. उपस्थितांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे मच्छे गावासह परिसरात शोककळा पसरली असून, गणेश विसर्जनाच्या उत्साहाला या दुर्दैवी घटनेने गालबोट लागले.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *