Sunday , October 4 2026
Breaking News

मराठा लाईट इन्फंट्रीच्या गणरायाचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन

Spread the love

 

बेळगाव : द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या गणपतीचे अर्गन तलाव येथे पारंपरिक पद्धतीने धार्मिक, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन करण्यात आले.

मिलिटरी महादेव मंदिरापासून अर्गन तलावापर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक लेझीम, झांज-पथक तसेच उत्साहपूर्ण मराठी लोकनृत्यांनी सहभागींचे लक्ष वेधून घेतले. तालबद्ध वाद्यांच्या गजरात जवान आणि नागरिकांनी मराठी संस्कृती व परंपरेचा सुंदर आविष्कार घडविला.

द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली विसर्जन सोहळा पार पडला.

यावेळी अधिकारी, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ), जवान, अग्निवीर, नागरी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपरिक पद्धतीने आणि शिस्तबद्ध वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *