Sunday , October 4 2026
Breaking News

श्रीमूर्ती विसर्जनाला सुरुवात : माळी गल्लीच्या ‘बेळगावचा लंबोदर’ गणेशमूर्तीचे विसर्जन

Spread the love

 

बेळगाव : माळी गल्ली येथील एसएसजीयू मंडळाच्या ‘बेळगावचा लंबोदर’ सार्वजनिक श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक गुरुवारी दुपारी ३ वाजता उत्साहात काढण्यात आली. पारंपरिक व भक्तिमय वातावरणात मिरवणूक मार्गक्रमण करत दुपारी ३.३० वाजता गणेशमूर्तीचे नवीन कपिलतीर्थ तलावात विसर्जन करण्यात आले.

सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनापूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री गंगा पूजन केले. त्यानंतर सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. माळी गल्ली येथील एसएसजीयू मंडळाची ‘बेळगावचा लंबोदर’ ही सार्वजनिक मंडळातील विसर्जन झालेली पहिली श्री गणेशमूर्ती ठरली.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *