








अथणी : अथणी शहराच्या बाहेरील मुरगुंडी–अथणी मार्गावरील मध्यवर्ती रस्त्यावर बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मोहन अशोक मिसाळ (वय २३, रा. संबरगी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयपूर–संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मोहन हे दुचाकीवरून प्रवास करत होते. त्याने हेल्मेट परिधान केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आला. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta