








बेळगाव : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत बेळगाव जिल्ह्यातील आणखी चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी (२३ सप्टेंबर) यासंदर्भातील आदेश जारी केला. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढली आहे.
शेतकरी आणि आमदारांकडून करण्यात आलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रामदुर्ग, गोकाक, सौन्दत्ती आणि कागवाड या चार तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश केला आहे.
यापूर्वी सरकारने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत बेळगाव जिल्ह्यातील अथणी, बैलहोंगल, बेळगाव, चिक्कोडी, रायबाग, कित्तूर, मूडलगी, निपाणी आणि यरगट्टी या नऊ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश केला होता.
आता नव्याने चार तालुके समाविष्ट झाल्याने बेळगाव जिल्ह्यातील एकूण १३ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाले आहेत. या घोषणेमुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार उपलब्ध होणाऱ्या मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta