Tuesday , September 22 2026
Breaking News

तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचे साहित्यिक मावळे तंजावरकडे रवाना!

Spread the love

 

बेळगाव : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा दक्षिण भारतात जपणाऱ्या ऐतिहासिक तंजावर नगरीत दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सरफोजीराजे भोसले (द्वितीय) मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगावचा साहित्यिक चमू तंजावरकडे उत्साहात रवाना झाला.

डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटक श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले, तंजावर हे आहेत. तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत मराठी साहित्याचा जागर घडविणाऱ्या या संमेलनात बेळगावच्या साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींचा सहभाग विशेष ठरणार आहे.

बेळगावकरांचा विशेष सन्मान

या संमेलनासाठी विशेष अतिथी म्हणून सीमाकवी रवींद्र पाटील आणि विशेष अतिथी आप्पासाहेब गुरव यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच प्रमुख पाहुणे ॲड. सुधीर चव्हाण यांच्यासह बेळगावच्या विविध क्षेत्रांतील साहित्यिक व साहित्यप्रेमींची उपस्थिती राहणार आहे.

बेळगावच्या या साहित्यिक चमूमध्ये कवी व्यं. कृ. पाटील, कवी रामदास बिर्जे, शिवसंत संजय मोरे या कवींना कविसंमेलनात निमंत्रीत करण्यात आले आहे .

यावेळी विलास पवार, उद्योजक टोपाणा पाटील, संजय गुरव, ॲड. एन. डी. पाटील, ॲड. महेश कदम, प्रा. रमेश भोसले, लेखक नितीन आनंदाचे, नारायण कणबरकर, मोहन पाटील सर, सुभेदार के. आर. मोटर, शिवाजी खांडेकर, सयाजीराव सावंत, शशिकांत अष्टेकर, कृष्णा गवंडी, मोहन मन्नोळकर, रघुनाथ पाटील, तानाजी पाटील, रामलिंग देसाई, मारुती पाटील, दिलीप चव्हाण, मनोहर संताजी आदींचा समावेश आहे.

तंजावरकडे निघाले साहित्यिक मावळे!

बेळगाव ते तंजावर हा प्रवास केवळ साहित्य संमेलनाचा नसून मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि तंजावरच्या मराठी वारशाशी नाते दृढ करणारा सांस्कृतिक प्रवास ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या आणि भोसले घराण्याच्या ऐतिहासिक परंपरेच्या साक्षीदार असलेल्या तंजावर भूमीत मराठी साहित्याचा जागर करण्यासाठी बेळगावचा हा साहित्यिक चमू उत्साहाने मार्गस्थ झाला आहे.

“तंजावर संमेलनासाठी निघाले मावळे…
तंजावर संमेलनात होणार बेळगावचा सन्मान…
आणि साहित्यिकांच्या कार्याचा होणार गौरव!”

अशा उत्साहपूर्ण वातावरणात बेळगावचा साहित्यिक चमू तंजावरकडे रवाना झाला असून, दि. २३ सप्टेंबरचा तंजावर साहित्य सोहळा मराठी साहित्य विश्वासाठी संस्मरणीय ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत दारूबंदी

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *