









बेळगाव : समाजातील सर्व समाजाच्या युवकांना एकत्रित करून आजच्या श्री गणेशाच्या महाआरतीचे निमंत्रण देऊन समाजामध्ये एकीची भावना निर्माण करण्याचे कार्य शिवज्योत युवक मंडळ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपत गल्ली उचगाव या युवक मंडळांनी करून दाखविले आहे, असे प्रतिपादन उचगाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बाळू देसुरकर यांनी यांनी व्यक्त केले.
येथील गणेशोत्सवाच्या महाआरतीसाठी उचगाव मधील सर्व मुस्लिम समाजाच्या सर्व युवकांना आणि व्यावसायिकांना एकत्रित करून आरतीचे आमंत्रण देण्यात आले होते त्यासाठी आरतीला सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आरतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उचगाव ब्लॉक काँग्रेस आहे कमिटीचे अध्यक्ष बाळू देसुरकर आणि बेनकनहळी येथील ब्रह्मलिंग सोसायटीचे व्हा. चेअरमन यल्लाप्पा देसुरकर आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती त्यावेळी बाळू देसुरकर आणि यल्लाप्पा देसूरकर यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून महाआरती करण्यात आली. या युवक मंडळाच्या वतीने गेली सत्तावीस वर्षे हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि समाजातील सर्वांना एकत्रित करून हा सण साजरा करण्याचे कार्य या युवक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. आज या आरतीसाठी उचगाव मधील सर्व मुस्लिम समाजाला एकत्रित करून त्यांना आरतीचे आमंत्रण देण्यात आले होते आणि सर्वजण मोठ्या उत्साहाने या आरतीला उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीत आजची महाआरती करण्यात आली.
त्यानंतर या युवक मंडळाने सादर केलेला भुताटकीचा देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सदर देखावा पाहण्यासाठी बेळगाव आणि खानापूर, चंदगड तालुक्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून दररोज रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत भाविकांची रीघ लागलेली आहे यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थिताचे मंडळाच्या वतीने पुष्पहार भगवा फेटा आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta