Monday , September 21 2026
Breaking News

दोन सरकारी बसची भीषण धडक; २५ हून अधिक प्रवासी जखमी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरातील आश्रय नगर येथे सोमवारी दोन सरकारी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्यांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने बैलहोंगल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बैलहोंगलहून बेविनकोप्पकडे जाणारी सरकारी बस पुढे जात असलेल्या दुसऱ्या सरकारी बसला मागून धडकली. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेची तीव्रता मोठी असल्याने दोन्ही बसमधील प्रवाशांना दुखापत झाली.

अपघातात विद्यार्थ्यांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जखमींना बैलहोंगल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची नोंद बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी संदीप पाटील यांची ‘बेळगावचा राजा’ला सदिच्छा भेट

Spread the love  बेळगाव : उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी चव्हाट गल्ली येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *