Friday , November 6 2026
Breaking News

बेळगाव

अनावश्यक निर्बंध लादणार नाही; वेळेत गणेश विसर्जन पूर्ण करा : पोलीस आयुक्त प्रकाश निकम

  बेळगाव : ऐतिहासिक बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांतील मिरवणूक व गणेशमूर्ती विसर्जन सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. यासंदर्भात शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २१) पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. गणेशोत्सवाच्या अंतिम दिवसांतील गर्दीचे नियोजन, मिरवणूक मार्ग आणि विसर्जन …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता

  सीमाभागासह महाराष्ट्राचे लक्ष बेळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी येत्या बुधवारी (२३ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणावर तातडीने सुनावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने सीमावादाचा दावा ‘मेंशन’ केल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर …

Read More »

बिजगर्णी हायस्कूलचा श्रीनाथ निलजकर जिल्हास्तरावर

  गोळाफेक स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक; जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश हायस्कूलमधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी श्रीनाथ चंद्रकांत निलजकर याने शिक्षण विभागातर्फे आयोजित ग्रामीण तालुकास्तरीय १७ वर्षांखालील वैयक्तिक गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली …

Read More »

हारूगेरीजवळ भीषण अपघात; दोघांची प्रकृती गंभीर

  बेळगाव : कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रायबाग तालुक्यातील कोळीगुड्ड गावाच्या हद्दीत घडली. अथणी–गोकाक मुख्य मार्गावरील कोळीगुड्ड गावाजवळ हा अपघात झाला. हारूगेरी येथील दुचाकीस्वार या अपघातात गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. स्थानिक नागरिकांनी …

Read More »

चव्हाट गल्ली स्फोट प्रकरणाला धक्कादायक वळण : स्फोटापूर्वी बकेट घेऊन आलेला अनोळखी व्यक्ती सीसीटीव्हीत कैद

पोलिस तपासाला नवा धागा बेळगाव : गणेशोत्सवाच्या उत्साहात असलेल्या एका कुटुंबावर काळाचा घाला घालणाऱ्या चवाट गल्लीतील डोर गल्ली येथील स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री फ्रिजचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या सात दिवसांनंतर शेजारील घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वी एका अनोळखी …

Read More »

इस्कॉनमध्ये राधाष्टमी उत्साहात साजरी

  बेळगाव : इस्कॉन चळवळीत श्रीमती राधा राणी यांचा जन्मदिन हा राधाष्टमी उत्सव म्हणून साजरा केला जातो. बेळगाव इस्कॉन च्या वतीने शनिवारी श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात राधाष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शनिवारी पहाटे मंगल आरती व श्रृंगार दर्शन झाल्यानंतर रशियाहून आलेल्या ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य श्री भक्ती विज्ञान …

Read More »

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रमही या उत्सवाला अधिक अर्थपूर्ण बनवतात. याच भावनेतून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, केळकर बाग येथील ‘बेळगांवचा कैवारी’ मंडळातर्फे यंदा ‘ज्ञान दान’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. गणपती बाप्पाला विद्या, ज्ञान आणि कलेचे दैवत मानले …

Read More »

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी : दुसऱ्या बाळंतपणानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने निलजी (ता. बेळगाव) येथील ब्रह्मलिंग गल्लीतील सौ. ज्योती निवृत्ती पाटील (वय २६) यांचा हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १७) पहाटे मृत्यू झाला. अवघ्या २६व्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली …

Read More »

दूध दरवाढीची शक्यता; प्रतिलिटर ८ रुपयांची वाढ मागण्याची तयारी

  बेळगाव : महागाईचा वाढता दबाव आणि पशुखाद्यासह दूध उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेता कर्नाटकात दूध दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. दूध संघ आणि उत्पादकांकडून प्रतिलिटर ८ रुपयांची दरवाढ करण्याची मागणी राज्य सरकार आणि कर्नाटक दूध महामंडळाकडे करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत आहेत. दूध दरवाढीबाबत चर्चा करून सरकारकडे अधिकृत …

Read More »

कारभार गल्ली गणेशोत्सव मंडळातर्फे उद्या गणहोम, सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद

  बेळगाव : वडगाव येथील कारभार गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘वडगावचा मानाचा राजा’ या गणेशमूर्तीचे शताब्दी वर्ष असल्याने मंडळातर्फे विशेष धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी गणहोम तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात …

Read More »