बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी, सरकारी मराठी प्राथमिक शाळा बेळगुंदी आणि बिजगर्णी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी शाळेतील पटसंख्या वाढावी आणि मराठी शाळा टिकविण्यासाठी …
Read More »मारिहाळ पोलिसांची गांजा विक्रीवर धाड; १३ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
बेळगाव : मारिहाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजाची विक्री करणाऱ्या एका युवकावर कारवाई करून त्याला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे १३ हजार रुपये किमतीचा २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी मुच्छंडी गावातील भारत गल्ली येथील रहिवासी प्रकाश अर्जुन बंगारी (वय २१) हा …
Read More »शहापूर विभाग गणेश उत्सव महामंडळाची बैठक रविवारी
बेळगाव : मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्या वतीने रविवार दि. 9 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री साईगणेश सोसायटी शहापूर या ठिकाणी बैठक बोलावण्यात आली आहे, तरी शहापूर विभागातील सर्व गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती शहापूर विभाग महामंडळाच्या वतीने नेताजी जाधव, अशोक चिंडक यांनी …
Read More »बडेकोळ्ळमठ अपघातप्रवण मार्गाच्या कायमस्वरूपी कामाला लवकरच सुरुवात
बेळगाव : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ येथील अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी सुधारणा करण्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अंतिम मंजुरी दिली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पाऊस ओसरताच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी …
Read More »मराठीचे शिलेदार मायमराठीसाठी एकत्र; राज्यभर संयुक्त जनजागृतीची घोषणा
मुंबई (मीरारोड) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या मीरारोड येथील मध्यवर्ती कार्यालयात राज्याध्यक्ष श्री. गोवर्धन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठी भाषा, मराठी अस्मिता, सीमाभागातील मराठी बांधवांचे न्याय्य हक्क तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. मराठी एकीकरण समिती, …
Read More »मराठा युवक संघातर्फे कै. एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ २१ व्या भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : मराठा युवक संघ, आबा व हिंद स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने कै. एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ २१ व्या भव्य जलतरण स्पर्धांचे आयोजन शनिवार, २९ ऑगस्ट आणि रविवार, ३० ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडणार असून, याबाबतचा निर्णय मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी अक्षता …
Read More »शिक्षणमहर्षी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
बेळगाव : माजी आमदार तथा शिक्षणमहर्षी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा वाढदिवस शुक्रवारी (७ ऑगस्ट) सिद्धार्थ बोर्डिंग, शहापूर येथे मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, फेटा आणि मानचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या …
Read More »मास्टर वेदांत आनंद मिसाळे याचे सी.बी.एस्.ई. जलतरण स्पर्धेत घवघवीत यश
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगावचा विद्यार्थी मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने सी.बी.एस.ई. साऊथ झोन–II जलतरण स्पर्धा २०२६–२७ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्यपदक (Bronze Medal) पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही स्पर्धा दि. २७ ते २९ जुलै …
Read More »प्रख्यात संवादिनी वादक सुधांशु कुलकर्णी यांना गुरु गौरव पुरस्कार
बेळगाव : बंगलोर येथील सतीश हंपीहोळी म्युझिक फाउंडेशन ट्रस्टने ‘ताल यात्रा’ या संगीत-नृत्य संगम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पंडित बसवराज बेंडिगेरी यांच्या स्मृत्यर्थ सुधांशू कुलकर्णी यांना ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे कर्नाटक कलाश्री मृत्युंजय शेट्टर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “गायन, वादन, …
Read More »सीमाभागातील मराठी शाळांना पुस्तके देण्यास हालचाल; युवा समितीच्या लढ्याला यश
बेळगाव : सीमाभागातील शासकीय मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके वेळेवर न मिळणे आणि अप्रत्यक्षपणे कन्नड भाषेची सक्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या समवेत विविध केंद्रीय आणि राज्य पातळीवर याबाबत तक्रार दाखल केली होती. भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या रक्षणासाठी युवा समितीने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta