Sunday , September 20 2026
Breaking News

बेकायदा पेट्रोल-डिझेल साठ्यावर सीसीबीचा छापा; 6.89 लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

दोघांना ताब्यात; वाहनासह पेट्रोल-डिझेल जप्त

बेळगाव : बेळगाव शहरातील सीसीबी पोलिसांनी देसूर गावाजवळील हॉटपॉट ढाब्याच्या परिसरात बेकायदा पेट्रोल व डिझेल साठवून विक्री करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत वाहनासह सुमारे 6 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तमीम हसनसाब येरगट्टी आणि साकीब शमिम अन्सारी अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोघे मालक इस्रार मुल्ला यांच्या सूचनेनुसार बेकायदा पेट्रोल व डिझेलची विक्री करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोणतीही आवश्यक सुरक्षा व्यवस्था न करता पाच बॅरलमध्ये सुमारे 900 लिटर पेट्रोल आणि अन्य पाच बॅरलमध्ये सुमारे 900 लिटर डिझेल साठवण्यात आले होते. विक्रीसाठी साठा करून ठेवण्यात आला असताना पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.

याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 215/2026 नुसार आवश्यक वस्तू कायदा 1955, पेट्रोलियम कायदा 1934, मोटर स्पिरिट व हायस्पीड डिझेल कायदा 2005 तसेच बीएनएसच्या कलम 287 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईबद्दल सीसीबीचे पीआय मंजुनाथ नाईक, पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *