Monday , October 5 2026
Breaking News

‘सीबीआय अधिकारी’ असल्याचे सांगत वृद्धेकडून १६ लाख रुपये उकळले

Spread the love

 

सायबर पोलिसांत गुन्हा

बेळगाव : ‘सीबीआय अधिकारी बोलत आहे’, असे सांगून एका ६६ वर्षीय वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्टची धमकी देत भामट्यांनी तब्बल १६ लाख रुपये उकळल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी लता नामक ६६ वर्षीय महिलेने शहर सायबर क्राईम पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी लता यांना ऑगस्ट २०२६ मध्ये एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला. ‘आम्ही सीबीआय अधिकारी बोलत आहोत. तुमचे आधार कार्ड अडीच कोटी रुपयांना दहशतवाद्यांना विकण्यात आले आहे,’ असे सांगत भामट्यांनी त्यांना घाबरविले. त्यानंतर व्हिडिओ कॉल करून फिर्यादीचे आधार कार्डही दाखविण्यात आले.

‘तुमच्या आधार कार्डाचा वापर करून दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तुम्ही दहशतवाद्याकडून अडीच कोटी रुपये घेतले आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येईल,’ अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी सांगितलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

भीतीपोटी फिर्यादीने २१ ऑगस्ट रोजी आरटीजीएसच्या माध्यमातून नऊ लाख रुपये सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर पुन्हा १७ सप्टेंबर रोजी सात लाख रुपये पाठविले. अशाप्रकारे एकूण १६ लाख रुपये भामट्यांच्या खात्यावर जमा झाले.

पैसे जमा केल्यानंतरही संशयितांकडून संपर्क सुरू राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शहर सायबर क्राईम पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलीस आयुक्त बी. एस. मंटूर यांच्या सूचनेनुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

मटका जुगार अड्ड्यावर काकती पोलिसांचा छापा; एक ताब्यात

Spread the love  बेळगाव : अवैधरीत्या मटका जुगार चालविणाऱ्या अड्ड्यावर काकती पोलिसांनी छापा टाकून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *