Sunday , October 4 2026
Breaking News

पॅरिसमध्ये चित्रकार विकास पाटणेकर यांच्या कलाकृतींवर चर्चासत्र

Spread the love

 

बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार विकास पाटणेकर यांच्या चित्रांवर पॅरिस येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. पॅरिसमधील रोक डी अंथेनर सभागृहात झालेल्या या चर्चासत्रात ‘क्रॉसड ग्लानसिस’ या पुस्तकात प्रकाशित झालेल्या विकास पाटणेकर यांच्या कलाकृतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या पाटणेकर यांच्या चित्राचे जगभरातील अनेक कला समीक्षकांनी कौतुक केले आहे. चर्चासत्रात सहभागी झालेल्या विविध कला समीक्षक तसेच चित्रकारांनी विकास पाटणेकर यांच्या चित्रशैलीविषयी आपली मते व्यक्त केली. त्यांच्या कलाकृतीतील वैशिष्ट्ये, मांडणी आणि कलात्मक दृष्टिकोनाचे यावेळी विशेष उल्लेख करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन बेनेडिक्त जोबे डुवाल यांनी केले होते. पॅरिसमधील या चर्चासत्रामुळे बेळगावच्या चित्रकाराच्या कलाकृतीला आंतरराष्ट्रीय कला क्षेत्रात मिळणारी दखल अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, आगामी काळात विकास पाटणेकर यांच्या चित्रांचे स्वतंत्र प्रदर्शन पॅरिस येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांकडून करण्यात आली. या प्रदर्शनामुळे पाटणेकर यांच्या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *