Sunday , October 4 2026
Breaking News

निपाणी दर्गाह उरुसानिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Spread the love

 

 

आज शिळा, बाशी उरूस ; पाकाळणी कार्यक्रमाने उरूसाची सांगता

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाला दोन दिवसापासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (ता.२२) संदल बेडीचा उरुस पार पडला. बुधवारी (ता.२३) भर उरूस पार पडला. त्यानिमित्त नैवेद्य अर्पण करण्यासह दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.
चव्हाण वारस, फकीर आणि मानकऱ्याच्या प्रमुख उपस्थितीत दर्गाह तुरबतीला नैवेद्य दाखवून भाविकांनी आपल्या दंडातील चांदीची बेडी दंडवत घालण्यासह देवाला गलेफ अर्पण केला. गंधरात्रीनिमित्त चव्हाण घराण्यातर्फे गंध व गलेफ मानकऱ्यांसह सवाद्य नेऊन तुरबतीस अर्पण करण्यात आला. चव्हाण वारसांतर्फे मलिदा, ताक, कण्या व गोडा नैवेद्य अर्पण त्याला. गंधरात्री जिजामाता चौकात आतषबाजी करण्यात आली.

यावेळी चव्हाण वारस, उरूस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई -सरकार, रणजित देसाई -सरकार, संग्रामसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, राजूबाबा निपाणकर, श्रीमंत दादाराजे देसाई निपांकर सरकार, संजय माने, विवेक मोकाशी, जयराम मिरजकर, प्रभाकर पठाडे, शरद माळगे, संजय पावले, बंडा गंथडे, संतोष गंथडे, सनी साळुंखे, आतिष सुतार, सचिन पावले, उरुस कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मानकरी उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता चव्हाण वाड्यात खारीक, उदीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मानाच्या फकीरांची रवानगी व भंडारखाना, चव्हाण वारसासह मानकर यांच्या उपस्थितीत पाकाळणीचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय संत बाबा महाराज चव्हाण समाधी व दर्गाहला गोडा नैवेद्य दाखविला जाणार आहे.
उरूस उत्सवासाठी शिवाजी चौक, कामगार चौक, दर्गाह गल्ली व दर्गाह परिसरात विविध खेळण्यांची दुकाने, मेवा मिठाईची दुकाने थाटण्यात आली आहेत. पाळण्यांचीही गर्दी झाली आहे. सुरळीत दर्शनासाठी महिला पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. राजू मुजावर, हमीद मुजावर, सुभान मुजावर, ख्वाजा मुजावर, मोदीन मुजावर, निहाल मुजावर, सद्दाम मुजावर, जाफर मुजावर, शब्बीर मुजावर, सलमान मुजावर, यासीन हवालदार, परशराम विटेकरी, रफीक बुदिहाळे यांच्यासह मानकरी मान्यवरांची उपस्थिती होती. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विविध बॅरिकेड्स लावल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरमध्ये सण-उत्सवांची पर्वणी

Spread the love  सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *