








बेळगाव : श्रद्धा आणि विश्वासाला भावनेची जोड मिळाल्यानंतर भक्तीचा अनुभव किती हृदयस्पर्शी असतो, याचा प्रत्यय बुधवारी केळकर बाग येथील ‘बेळगावचा कैवारी’ गणरायाच्या दरबारात आला.
गेल्या वर्षी एका भाविकाची मुलगी गंभीर आजाराने त्रस्त होऊन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत होती. मुलीची प्रकृती चिंताजनक असताना या भाविकाने ‘बेळगावचा कैवारी’ गणरायाला गाऱ्हाणे घालत, मुलगी सुखरूप बरी झाल्यास नवस फेडण्याचा संकल्प केला होता.
गणरायाच्या कृपेने मुलगी उपचारानंतर सुखरूप झाली. आपला नवस पूर्ण करण्यासाठी संबंधित भाविकाने बुधवारी आपल्या मुलीसह केळकर बाग येथे येऊन गणरायाच्या चरणी माथा टेकविला आणि नवस फेडला.
यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांसमोर गेल्या वर्षीची संपूर्ण घटना सांगितली. मुलगी आज आपल्या सोबत सुखरूप उभी असल्याचे पाहून उपस्थित भाविकही भावुक झाले.
हा प्रसंग ऐकताच उपस्थितांमधून एकच जयघोष दुमदुमला “भक्ताने मागावं… अन् कैवारीने द्यावं!”
श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचा हा भावस्पर्शी क्षण उपस्थितांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेले.

Belgaum Varta Belgaum Varta