Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथे क्रीडा साहित्य भेट

  मच्छे : येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथे विद्यमान एसडीएमसी अध्यक्ष, श्री बालशिवाजी वाचनालयाचे माजी अध्यक्ष तसेच उद्योजक व समाजहितैषी व्यक्तिमत्त्व श्री. गजानन छप्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना फुटबॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन संच तसेच इतर विविध क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांच्या निवेदनाची महापालिकेकडून दखल; न्यू गुड्सशेड रस्त्याची पाहणी

  बेळगाव : बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्सशेड रस्त्याची अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी दिनांक 10/06/2026 रोजी माननीय आयुक्त, महानगरपालिका बेळगाव यांना निवेदन दिले होते. संबंधित निवेदनाची दखल घेत माननीय आयुक्त महोदयांनी सोमवार, दिनांक 15/06/2026 रोजी विभाग अधिकारी शिल्पा जयराम यांना सदर …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी ‘निबंध स्पर्धा २०२६’ चे आयोजन

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था (मुंबई), विश्व भारत सेवा समिती (बेळगाव), पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय (शहापूर) आणि मंथन मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकातील मराठी विद्यार्थ्यांसाठी ‘निबंध स्पर्धा २०२६-२७’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक २० जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता …

Read More »

मराठीसाठी सक्रिय झाल्याचे दिसताच शुभम शेळके यांनी पुन्हा नोटीस

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हे यांना कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये पाच लाखाचा बॉंड आणि तितक्याच रक्कमेचे दोन जामीनदार घेऊन पोलिस उपायुक्त यांच्या समोर उपस्थित राहावे असे कळविले आहे. विशेष म्हणजे सदर नोटीस 12 जून रोजीची असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेस नेत्या आयेशा सनदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

  बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या तरुणाच्या बाजूने उभे राहत पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या आयेशा सनदी यांच्याविरोधात शहरातील माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, खानापूर येथील बद्रुद्दीन किल्लेदार याने विवाहाचे आश्वासन देत संबंधित युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित …

Read More »

उद्यमबागमध्ये खळबळ! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तब्बल ५९ जिवंत काडतुसे सापडली

  बेळगाव : बेळगाव शहरातील उद्यमबाग औद्योगिक परिसरात सोमवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. रस्त्यालगतच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तब्बल ५९ जिवंत काडतुसे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी नेहमीप्रमाणे उद्यमबाग परिसरात कचरा संकलन आणि वर्गीकरणाचे काम करत होते. यावेळी …

Read More »

विद्यार्थ्यांच्या मोफत बससेवेसाठी अर्ज प्रक्रिया ठप्प; पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

  बेळगाव : कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी सेवा सिंधु या शासकीय संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, सध्या बस पाससाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित सेवा डिसेबल (बंद) असल्याची सूचना संकेतस्थळावर दिसून येत आहे. यामुळे हजारो विद्यार्थी …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घडवून द्यावी; खास. धनंजय महाडिक यांना निवेदन

  बेळगाव : येत्या १९ आणि २० जून रोजी भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्यात सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला श्री. अमित शहा यांची भेट घडवून द्यावी अशा आशयाचे निवेदन पत्र खासदार तथा तज्ञ समितीचे सदस्य धनंजय महाडिक यांना देण्यात आले. …

Read More »

दोन कोटींच्या विमा रकमेसाठी निवृत्त सैनिकाची हत्या; पत्नीसह ९ जण अटकेत

  बेळगाव : दोन कोटी रुपयांच्या विमा दाव्याच्या लोभापोटी निवृत्त सैनिकाची कट रचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. घटप्रभा आणि यमकनमर्डी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाचा यशस्वी छडा पोलिसांनी लावला. मृताची ओळख संदीप कलगौडा मंजरगी (वय …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी लक्ष घालण्याचे मनोज जरांगे यांचे आश्वासन

  कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण लक्ष घालू आणि या विषयाकडे गांभीर्याने पाहू, अशी ग्वाही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. सोमवारी कोल्हापूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सीमाभागातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या जरांगे यांनी समितीच्या …

Read More »