Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

कन्नड सक्तीविरोधातील मोर्चासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जनजागृती

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेशी निगडित असलेल्या कन्नड सक्तीच्या प्रश्नाविरोधात जनमत जागृत करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने २२ जून रोजी बेळगाव शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविली. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि वस्तीभागांमध्ये पत्रकांचे वाटप करून नागरिकांना आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी लढ्याची दिशा याबाबत माहिती देण्यात आली. या …

Read More »

हेल्मेट वापरा, जीव वाचवा! बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे हेल्मेट जनजागृती सप्ताहाला प्रारंभ

  बेळगाव : दुचाकीस्वारांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालणे या उद्देशाने बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे हेल्मेट जनजागृती सप्ताहाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे आयोजित कार्यक्रमात उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ …

Read More »

कै. नारायणराव चुडामणी मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्याचे वितरण

  बेळगाव : कै. नारायणराव चुडामणी मोदगेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कै. नारायण चुडामणी मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे रणझुंझार शिक्षण संस्था संचलित रणझुंझार हायस्कूल, विद्यामंदिर व कॉन्व्हेंट स्कूल, निलजी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विमलताई अशोकराव मोदगेकर या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. …

Read More »

होम मिनिस्टर व फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचा गौरव

  बेळगाव : एंजल फाउंडेशन आणि केजी क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खासबाग येथील जयशंकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर व फॅशन शो कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे आणि फॅशन शोमुळे कार्यक्रमात रंगत निर्माण झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय पाटील …

Read More »

उतारा समस्येवरून शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

  बेळगाव : जमिनीच्या उताऱ्यासंदर्भातील अडचणी, वाढते शुल्क आणि कथित अनियमिततेच्या निषेधार्थ राज्य किसान संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. उतारा मिळविताना शेतकऱ्यांना आर्थिक व प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी जमिनींच्या एकत्रित नोंदी असल्यामुळे स्वतंत्र उतारा …

Read More »

स्वरूपायनमधून प्रा. स्वरूपा इनामदार यांनी उलगडले स्त्रीचे विविध पैलू

  ‘कवी समजून घेताना’ उपक्रमाचे सातवे पुष्प उत्साहात संपन्न बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने आयोजित ‘कवी समजून घेताना’ या उपक्रमाच्या सातव्या पुष्पात ज्येष्ठ कवयित्री, शब्दगंध कवी मंडळाच्या सदस्या तथा सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार यांनी आपल्या कवितांमधून स्त्रीजीवनाचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडून दाखविले. सरस्वती वाचनालय, …

Read More »

येळ्ळूर म.ए. समितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर

  सीमा प्रश्नाच्या लढ्यासाठी गाव पुन्हा संघटित; आगामी मोर्चे व आंदोलनात मोठ्या सहभागाचा निर्धार येळ्ळूर : सीमाप्रश्नाच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी आणि सेक्रेटरीपदी प्रकाश अष्टेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. १४) यरमाळेजवळील …

Read More »

युवा समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मराठी शिक्षण, नेतृत्व व स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर गटशिक्षण विभागात पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न. हा सोहळा रविवार १४ जून रोजी श्री …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या २२ जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे तरी या मोर्चात सहभागी होण्यासाठी तसेच सीमाप्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती पावले उचलली जावी आणि तज्ञ समिती बैठक बोलाविण्यात यावी यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धरणं आंदोलन करण्यात येणार …

Read More »

कन्नड फलकसक्तीविरोधात २२ जूनच्या भव्य मोर्चासाठी आजपासून जनजागृती मोहीम

  बेळगाव : बेळगाव शहर आणि सीमाभागात सुरू असलेल्या कन्नड फलकसक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आता आक्रमक भूमिका घेतली असून, २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजपासून व्यापक जनजागृती मोहिमेला प्रारंभ करण्यात येत आहे. मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी समितीचे कार्यकर्ते शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांशी थेट …

Read More »