बेळगाव : शहरात साखळीचोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असून, गावावरून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी रात्री टिळकवाडीतील हिंदूनगर परिसरात घडली. महिलेने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संपूर्ण गंठण चोरट्यांच्या हाती न लागता त्यातील काही भाग वाचला. माहितीनुसार, जयश्री (पूर्ण नाव उपलब्ध नाही) …
Read More »काँग्रेस अध्यक्षपद निवड प्रक्रियेत पुन्हा वाद; बेळगाव काँग्रेस कार्यालयात शाब्दिक चकमक
बेळगाव : महानगर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान बेळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी पुन्हा गटबाजी उफाळून आली. विविध गटांच्या नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) नियुक्त निरीक्षकांकडून महानगर काँग्रेस अध्यक्षपदासाठी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची …
Read More »बिजगर्णी हायस्कूलच्या मैदानावर झोनल माध्यमिक शालेय स्पर्धांचे आयोजन
बिजगर्णी : पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूल क्रीडांगणावर बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार ३१ जुलै रोजी सकाळी 9 वाजता संस्था उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या स्पर्धांचे उद्घाटन बाळू देसूरकर यांच्या हस्ते …
Read More »विद्याभारती राज्य अथेलिटिक स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचे खेळाडू रवाना
बेळगाव : कलबुर्गी येथील श्री चंद्रशेखर क्रीडांगण मैदानावर गुलबर्गा विद्याभारती आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा शाळेचे खेळाडू रवाना झाले आहेत. 29 ते 31 जुलै दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय अथेलटिक स्पर्धेसाठी संत शाळेचे खेळाडू प्रशिक्षक शिवकुमार सुतार, स्वाती घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू समीक्षा खन्नुरकर, निधीशा दळवी, मेघा …
Read More »नगरविकास मंत्र्यांकडून बेळगावच्या विकासकामांचा आढावा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक इशारा
बेळगाव : सुवर्ण विधानसौध येथे नगरविकास मंत्री डॉ. यतिंद्र सिद्दरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव महापालिका आणि बुडाच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. विकासकामांमध्ये दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी कडक शब्दांत सुनावत कामात कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला. बेळगाव, धारवाड आणि कलबुर्गी शहरांमध्ये एल अँड टी …
Read More »बेळगाव मनपावर कन्नड संघटनांचा दबाव; ‘अविभाज्य कर्नाटक’ ठरावाची मागणी
बेळगाव : बेळगाव महापालिकेत ‘बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे’ असा ठराव तातडीने मंजूर करावा, या मागणीसाठी कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी नगरविकास मंत्री यतिंद्र सिद्दरामय्या यांची भेट घेत सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून महापालिकेत संबंधित ठराव मंजूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी …
Read More »भरधाव कारचा शिक्षिकेला जोरदार धक्का; अपघातानंतर चालकाने काढला पळ
बेळगाव : शहरात बेफाम वाहन चालवणे पुन्हा एकदा जीवघेणी ठरली. शाळेत कर्तव्यावर जाणाऱ्या एका शिक्षिकेच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक देऊन गंभीर अपघात घडविला. धडक दिल्यानंतर जखमी शिक्षिकेला रस्त्याच्या कडेला बसवून कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने संतापाची लाट उसळली आहे. माहितीनुसार, टिळकवाडी येथील सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक ९ मधील …
Read More »सिद्धरामय्या राजकारणातून निवृत्त होणार नाहीत : मंत्री यतींद्र सिद्धरामय्या
बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले असले, तरी त्याचा अर्थ ते सक्रिय राजकारणातून निवृत्त होत आहेत असा अजिबात नाही, असे नगरविकास मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सिद्धरामय्या यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले असले, …
Read More »विजेच्या धक्क्याने यंत्रमाग कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : यंत्रमागावर काम करत असताना विजेचा धक्का लागून एका विणकर कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी वडगाव येथील सपार गल्लीमध्ये घडली. या प्रकरणाची नोंद शहापूर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत कामगाराचे नाव द्यामण्णा ऊर्फ पुंडलिक चंद्राप्पा अंची (वय ३४) असे आहे. …
Read More »शारदा विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी
बेळगाव : येथील शारदा विद्यालयात शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका स्वाती घोडकेकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. दीपप्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली. आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व शाळेच्या शिक्षिका सौ. दिव्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta