Monday , September 21 2026
Breaking News

शारदा विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : येथील शारदा विद्यालयात शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका स्वाती घोडकेकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली.

दीपप्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली. आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व शाळेच्या शिक्षिका सौ. दिव्या नेतलकर यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शाळेचे चेअरमन श्री. कृष्णकुमार चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, भजन, श्लोक, अभंग, भाषण आणि नाटिका अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. ‘विठ्ठल विठ्ठल’च्या नामघोषाने संपूर्ण सभागृह भक्तिमय झाले. विठ्ठल, रुक्माई आणि वारकरी यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी सभागृहात रिंगण धरत आषाढी वारीची अनुभूती उपस्थितांना करून दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून वारीचे मनोहारी दर्शन घडविले. व्यवस्थापन मंडळाचे सदस्यही कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सौ. शर्मिला पाटील यांच्या निरोपपर भाषणाने झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शारदा विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *