Monday , September 21 2026
Breaking News

विहान कपिलेश्वरकरची भारतीय कराटे संघात निवड

Spread the love

 

बेळगाव : मूळचा बेळगावचा सध्या बंगळूर येथे वास्तव्यास असलेला विहान मंदार कपिलेश्वरकर याची भारताच्या कराटे संघात निवड झाली असून, तो जपानमधील नाहा, ओकिनावा येथे आयोजित ‘द थर्ड ओकिनावा कराटे वर्ल्ड फेस्टिव्हल डेमॉन्स्ट्रेशन अँड टूर्नामेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यासाठी बंगळूरहून जपान येथे भारतीय कराटे संघाने नुकतेच प्रयाण झाले आहे. ओकिनावा हे पारंपरिक कराटेचे जन्मस्थान म्हणून जगभर ओळखले जाते. ओकिनावा प्रिफेक्चरल सरकार आणि ओकिनावा कराटे वर्ल्ड टूर्नामेंट कार्यकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव पारंपरिक ओकिनावा कराटेच्या तंत्र, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने भरविला जातो. जगभरातील कराटेपटूंना एकत्र आणून स्पर्धा व प्रात्यक्षिके, कराटे चर्चासत्र आणि सांस्कृतिक देवाणघेवाण याद्वारे कराटेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हा या महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे. विहानने अनेक वर्षांच्या कठोर सराव आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळविले आहे. पारंपरिक ओकिनावा शोरिन-र्यू कराटेचा अभ्यास करणारा विहान या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, ही त्याच्यासाठी तसेच बेळगावशी निगडित असलेल्या त्याच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे. विहान मंदार कपिलेश्वरकर हा नितीन कपिलेश्वरकर यांचा नातू होय.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *