Monday , September 21 2026
Breaking News

विजेच्या धक्क्याने यंत्रमाग कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : यंत्रमागावर काम करत असताना विजेचा धक्का लागून एका विणकर कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी वडगाव येथील सपार गल्लीमध्ये घडली. या प्रकरणाची नोंद शहापूर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मृत कामगाराचे नाव द्यामण्णा ऊर्फ पुंडलिक चंद्राप्पा अंची (वय ३४) असे आहे. ते मूळचे बुदिगोप्प (ता. यरगट्टी) येथील रहिवासी असून सध्या शगनमट्टी (ता. बेळगाव) येथे वास्तव्यास होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. २७ जुलै) रोजी सकाळी द्यामण्णा अंची हे नेहमीप्रमाणे सपार गल्ली येथील यंत्रमागावर कामासाठी गेले होते. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास काम करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या घटनेप्रकरणी मृताच्या आई मल्लव्वा चंद्राप्पा अंची यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *