Sunday , September 20 2026
Breaking News

विद्याभारती राज्य अथेलिटिक स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचे खेळाडू रवाना

Spread the love

 

बेळगाव : कलबुर्गी येथील श्री चंद्रशेखर क्रीडांगण मैदानावर गुलबर्गा विद्याभारती आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा शाळेचे खेळाडू रवाना झाले आहेत.
29 ते 31 जुलै दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय अथेलटिक स्पर्धेसाठी संत शाळेचे खेळाडू प्रशिक्षक शिवकुमार सुतार, स्वाती घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू समीक्षा खन्नुरकर, निधीशा दळवी, मेघा कलखाबकर, स्वाती पडनाडी, संचिता सुतार, सृष्टी सातेरी, सिंचना तिगडी, दूर्वा पाटील, भावना बेरर्डे, ईश्वरी कुलकर्णी, खुशी हिरेमठ, श्रद्धा भंडारगळी, अनिरुद्ध हलगेकर, यश हलशीकर, आर्यन कलखाबकर, मयाक कलखाबकर, अरविंद अनगोळकर, सतीश वतनदार, समर्थ बेकवाडकर, अथर्व गोरल, संचित धामणेकर, श्रेयस किल्लेकर या खेळाडूंचा संघात समावेश आहे.
या खेळाडूंना विद्यापीठ जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, प्रशिक्षक शिवकुमार सुतार, अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्दरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांचे मार्गदर्शन व पालक वर्ग यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *